18 de enero de 2025

Extraterrestres

Informaciones Exclusivas sobre extraterrestres y ovnis en todo el mundo.

UFO Spotted in Manipur? मणिपूरच्या इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आढळली अज्ञात उडणारी वस्तू; उड्डाण सेवेवर परिणाम | 📰 LatestLY मराठी

UFO Spotted in Manipur? मणिपूरच्या इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ आढळली अज्ञात उडणारी वस्तू; उड्डाण सेवेवर परिणाम | 📰 LatestLY मराठी

विमानतळ संचालक चिपेम्मी केशिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'इम्फाळ नियंत्रित हवाई हद्दीत एक अज्ञात उडणारी वस्तू दिसल्याने उड्डाणांवर परिणाम झाला. प्राधिकाऱ्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विमानसेवा सुरू झाली.' Socially टीम लेटेस्टली| Nov 19, 2023 09:40 PM IST मणिपूरच्या इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी एक अज्ञात उडणारी वस्तू (UFO) किंवा संशयास्पद ड्रोन दिसल्याने सामान्य विमान

विमानतळ संचालक चिपेम्मी केशिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इम्फाळ नियंत्रित हवाई हद्दीत एक अज्ञात उडणारी वस्तू दिसल्याने उड्डाणांवर परिणाम झाला. प्राधिकाऱ्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विमानसेवा सुरू झाली.’

Socially

टीम लेटेस्टली|

Nov 19, 2023 09:40 PM IST

मणिपूरच्या इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी दुपारी एक अज्ञात उडणारी वस्तू (UFO) किंवा संशयास्पद ड्रोन दिसल्याने सामान्य विमान सेवा प्रभावित झाली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे दोन उड्डाणे वळवण्यात आली आणि तीन विमानांना उशीर झाला. सुमारे तीन तासांनंतर सेवा पूर्ववत झाली. विमानतळ संचालक चिपेम्मी केशिंग यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘इम्फाळ नियंत्रित हवाई हद्दीत एक अज्ञात उडणारी वस्तू दिसल्याने उड्डाणांवर परिणाम झाला. प्राधिकाऱ्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विमानसेवा सुरू झाली.’ एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांना दुपारी 2.30 वाजता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) कडून एक संदेश मिळाला, ज्यात त्यांना विमानतळाजवळ युएफओ आढळल्याची माहिती देण्यात आली. संध्याकाळी 4 वाजेपर्यंत युएफओ उघड्या डोळ्यांनी एअरफिल्डच्या पश्चिमेकडे सरकताना दिसत होता. (हेही वाचा: Manipur Violence: हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये इंटरनेटवरील बंदी 5 दिवसाने वाढवली)

UFO Spotted in Manipur? Unknown Flying Object Affects Flight Services in Manipur’s Imphal International Airport #UFO #Manipur #Imphal https://t.co/gZuK6TzzZV

— LatestLY (@latestly) November 19, 2023

(‘सोशली’ (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)