इंफाळ विमानतळाजवळ एक उडणारी अनोळखी वस्तू (यूएफओ) दिसल्याच्या बातमीने खळबळ उडाली आहे. या यूएफओचा शोध घेण्यासाठी भारतीय वायूदलाने दोन राफेल विमानं पाठवली होती.
मणिपूरची राजधानी इंफाळच्या विमानतळावर एका बातमीने खळबळ उडाली आहे. विमानतळाजवळ एक उडणारी अनोळखी वस्तू (UFO – Unidentified Flying Object) दिसल्याची बातमी मिळाल्यानंतर भारतीय वायूसेनेने दोन राफेल लढाऊ विमानं यूएफओ शोधण्यासाठी पाठवली. दुपारी २.३० वाजता ही घटना घडली. तसेच या बातमीचा अनेक व्यावसायिक विमानांच्या उड्डाणांवर परिणाम झाला. या विमानांच्या उड्डाणाची वेळ बदलण्यात आली.
संरक्षण विभागातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे की, इंफाळ विमानतळावर यूएफओ दिसल्याच्या बातमीने विमानतळ प्रशासनाचा गोंधळ उडाला होता. ही बातमी मिळताच इंफाळजवळच्या भारतीय वायूदलाच्या तळावरून एक राफेल लढाऊ विमान यूएफओच्या शोधात पाठवण्यात आलं. अत्याधुनिक सेन्सर्स असलेल्या या विमानाने संशयित भागात यूएफओ शोधण्यासाठी उड्डाण केलं. ज्या भागात यूएफओ दिसल्याची बातमी मिळाली होती, त्या भागात राफेलने शोधाशोध केली. परंतु, यूएफओ कुठेही सापडलं नाही.

Karnataka Bandh : शाळा बंद, विमानं रद्द, वाहतूक खंडित, संचारबंदी लागू; कर्नाटकात पाणी प्रश्न पेटला, २०० आंदोलनकर्ते ताब्यात

VIDEO : सी-२९५ विमान वायूदलाच्या ताफ्यात दाखल, संरक्षण मंत्र्यांनी काढलं स्वस्तिक, ओम; पूजा करून धागाही बांधला

विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

विमानात प्रवासी बसले, पण वैमानिकाचा पत्ता नाही; काय घडले नेमके?
यूएफओच्या शोधात पाठवण्यात आलेलं पहिलं राफेल विमान परतल्यानंतर वायूदलाने आणखी एक राफेल विमान यूएफओच्या शोधात पाठवलं. दुसऱ्या राफेल विमानाच्या पायलटलाही यूएफओ आढळलं नाही. दरम्यान, संरक्षण अधिकारी यूएफओची महिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण इंफाळ विमानतळाजवळ यूएफओ उडतानाचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत.
हे ही वाचा >> “हमासने इस्रायलवर हल्ला केलाच नाही, हा हल्ला…”; पॅलेस्टिनचा मोठा दावा, म्हणाले…
दरम्यान, यूएफओच्या बातमीनंतर वायूदलाने एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझ्म ही प्रणाली सक्रीय केली आहे. वायूदलाच्या ईस्टर्न कमांडने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, भारतीय वायूदलाने इंफाळ विमानतळावरील कथित यूएफओशी संबंधित व्हिडीओच्या आधारावर सुरक्षेसाठी एअर डिफेन्स रिस्पॉन्स मेकॅनिझ्म प्रणाली सक्रीय केली आहे. परंतु, अशी कोणतीही उडणारी वस्तू आढळली नाही.
Web Title: Ufo sighted at imphal airport flight operations disrupted 2 rafale fighter jets take off for searching asc
Más historias