विमानाच्या खिडकीतून दिसली ‘यूफो’?
UFO

न्यूयॉर्क : एलियन म्हणजेच परग्रहवासीयांचे अस्तित्व आहे की नाही याबाबत उलटसुलट मते आहेत. विज्ञानाने अद्याप याबाबत मौनच बाळगले असले तरी अंतराळाच्या या अफाट पसार्‍यात केवळ पृथ्वी नावाच्या ग्रहावरच जीवसृष्टी असेल असे म्हणणे हे ‘कुपमंडूक’ वृत्तीसारखेच ठरू शकते. जगभरातून अनेक वेळा ‘यूफो’ UFO म्हणजेच उडत्या तबकड्या पाहिल्याचे दावे होत असतात. या तबकड्या म्हणजे एलियन्सची अंतराळयाने आहेत असे म्हटले जाते. आता असाच दावा एका प्रवाशाने केला आहे. 35 हजार फूट उंचीवर विमान उडत असताना विमानाच्या खिडकीतून एलियनचे यूफो पाहिल्याचा दावा या प्रवाशाने केला आहे.

‘यूफो’ UFO अर्थात ‘अनआयडेंटीफाईड फ्लाईंग ऑब्जेक्ट’ संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीमध्ये विमान प्रवाशाने तथाकथित ‘यूफो’ कॅप्चर केले आहे. विमान 35 हजार फूट उंचीवर उडत असताना त्याला ही ‘यूफो’ दिसली. बोगोटा शहरातून कोलंबियातील सेलेंटो शहराकडे जात असलेल्या विमानातून हा प्रवासी प्रवास करत होता. त्याने टिपलेली ही क्लिप स्पॅनिश फोरम फोरोकोचेसने देखील शेअर केली आहे.

काही लोकांनी हे ‘यूफो’ UFO नसून ड्रोन असल्याचा दावा केला. मात्र, ड्रोन इतक्या उंच उडू शकत नाहीत. यामुळे हे ’युफो’च असल्याचा दावा केला जात आहे. प्रचंड वेगाने हे कथित ‘यूफो’ पुढे जात असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. यापूर्वी ‘नासा’च्या या 33 पानांच्या अहवालात ‘यूफो’ हे आपल्या ग्रहाचे सर्वात मोठे रहस्य असल्याचे वर्णन करण्यात आले. अलीकडेच मेक्सिकोच्या संसदेत कथित परग्रहवासीयांचे दोन मृतदेह किंवा ममी दाखवण्यात आल्या होत्या. त्यावेळेपासून परग्रहवासी आणि यूफोबाबतच्या चर्चांमध्ये वाढ झाली आहे.